chakan crime News : रेकॉर्डवरील चोरट्याकडून 11 महागड्या दुचाकी जप्त; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

एमपीसी न्यूज – महागड्या दुचाकी चोरणारा सराईत वाहनचोर चाकण येथे चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आला असता गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. तसेच त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली असून एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 7 लाख 55 हजारांच्या 11 महागड्या स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आल्या.

प्रतीक मच्छिन्द्र टावरे (वय 19, रा. चाकण), हरिभाऊ दत्ता जाधव (वय 39, रा. वाडे बोल्हाई, ता. हवली), नासिर मोहम्मद शेख (वय 50, रा. निमगाव शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस चाकण परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई ढाकणे आणि कोळेकर यांना माहिती मिळाली की, सराईत वाहनचोर प्रतीक टावरे हा चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी शिक्रापूर-चाकण रोडवर मेदनकरवाडी फाट्याजवळ येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्या चौथ्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चौघांकडून 7 लाख 55 हजारांच्या 11 स्पोर्ट व अन्य महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड, गिरीश चामले, कर्मचारी हजरत पठाण, यदु आढारी, नाथा केकान, सचिन मोरे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, महेश भालचिम, राजकुमार हनुमंते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, एस. डी. नांगरे, राहुल सूर्यवंशी, प्रमोद ढाकणे, गजानन आगलावे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.