Maval News :  एमआयडीसीच्या 32(1) प्रक्रियेस अद्याप मान्यता नाही- आमदार सुनील शेळके 

आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची विरोधकांची घाई झाल्याचा आरोप 

एमपीसीन्यूज :  एमआयडीसी टप्पा क्र.4 च्या 32(1) प्रक्रियेस कुठल्याही प्रकारची मान्यता अद्याप मिळालेली नाही.  फक्त आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची घाई विरोधकांकडून होत असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी आज एमआयडीसी टप्पा क्र.4च्या 32(1) प्रक्रियेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यता दिली असल्याचे सांगितले. परंतु, अशी कुठलीही अधिकृत मान्यता अद्याप मिळाली नसल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

प्रधान सचिवांनी 15 दिवसांपूर्वीच 32(1)  ची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, परंतु, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली असून 90 टक्के मागण्या पूर्ण करण्यात आम्ही यशस्वीही झालो असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.

तसेच यासंदर्भात अद्याप कुठलेही परिपत्रक निघालेले नाही, परिपत्रक निघाल्यानंतर मावळच्या जनतेला सविस्तर माहिती  देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेतला जाईल, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.