Chakan Crime News : मेदनकरवाडीत साडेपाच लाखांची देशी-विदेशी दारु व बिअर जप्त

सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – देशी-विदेशी दारु व बिअरची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्या जवळून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.28) रात्री साडे आठच्या सुमारास मेदनकरवाडी, चाकण याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

स्वप्निल नवनाथ काळढोके (वय 28, रा. कुरळी, ता. खेड), लक्ष्मण श्रीकांत जाधवर (वय 28, धावडे वस्ती, भोसरी) व एक वाईन शॉप चालक ( नाव माहित नाही ) अशा तिघांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (एम एच 14, एचयु 2075) या टेम्पोमधून देशी-विदेशी दारु व बिअरची विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये 67 हजार 760 किंमतीची देशी-विदेशी दारु व बिअर आणि 4 लाख 80 हजार रुपयांची पिकअप, असा एकूण 5 लाख 48 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.