Chakan crime News : एरिया मॅनेजरने कंपनीतून चोरले वाहनाचे सुटे भाग

एमपीसी न्यूज – कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करणा-या अधिकाऱ्याने कंपनीतून 54 हजार 500 रुपये किमतीचे वाहनाचे पार्ट चोरून नेले. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी दुपारी निघोजे येथील महिंद्रा व्हेईकल मॅनिफॅक्चरल लिमिटेड या कंपनीत घडली.

गौरव अश्विनीकुमार शर्मा (रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या एरिया मॅनेजरचे नाव आहे. याबाबत मुकेश गोपाल प्रसाद कपूर (वय 52, रा. रावेत) यांनी गुरुवारी (दि. 29) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव हा निघोजे येथील महिंद्रा व्हेईकल मॅनिफॅक्चरल लिमिटेड या कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता. 11 ऑक्टोबर रोजी त्याने कंपनीतून टी यु व्ही गाडीचे हेड लाईटचे व्होल्टेज कंट्रोलर आणि ड्रायव्हर इन्फोर्मेशन सिस्टीम हे 54 हजार 500 रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.