Chakan crime News : मारहाणीचा जाब विचारणा-या दुचाकीस्वाराला शस्त्राच्या धाकाने मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज – चौघेजण एकाला भर रस्त्यात मारहाण करत होते. त्यामुळे रस्त्याने जाणा-या एका दुचाकीस्वाराने मारहाण करणा-यांना मारहाणीचा जाब विचारला. त्यावरून चौघांनी मिळून दुचाकीस्वाराला शस्त्राचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री बारा वाजता चाकण परिसरात एच पी चौक ते खालुम्ब्रेकडे जाणा-या रस्त्यावर घडली.

सोमनाथ धनंजय आल्हाट (वय 26, रा. नानोली, ता. मावळ) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी नुरमोहम्मद हमीद सय्यद (वय 18, रा. घरकुल, चिखली) याला अटक केली आहे. त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बारा वाजता फिर्यादी आल्हाट दुचाकीवरून (एमएच 14 / डी डब्ल्यू 2710) एच पी चौकाकडून खालुम्ब्रेकडे जाणा-या रस्त्याने जात होते.

त्यावेळी रस्त्यावर चारजण एकाला बेदम मारहाण करत होते. त्यामुळे आल्हाट यांनी तिथे जाऊन मारहाण करणा-यांना जाब विचारला.

यावरून चौघांनी मिळून आल्हाट यांना ‘तू आम्हाला विचारणा कोण’ असे म्हणून त्यांना मारहाण केली. एकाने तलवार गळ्याला लाऊन आल्हाट यांना पकडले. तर दोघांनी त्यांच्या खिशातून 1 हजार 100 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आल्हाट यांना मारहाण करून चौघेजण निघून गेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.