Pimpri crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – माहेराहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

पती सद्दाम शेख, सासू सायरा शेख, सासूची बहिण अनिसा शेख, रिहाना शख, मावस दीर अल्तमस शेख, नसरूद्दीन शेख (सर्व रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने मंगळवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 मे 2013 ते 6 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत पिंपरी येथे घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहितेने माहेराहून पैसे आणावेत यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

फिर्यादी यांना पतीने हाताने व पट्ट्याने मारहाण केली. इतर आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच आरोपी अल्तमस शेख हा मारण्यासाठी अंगावर धावून आला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.