Chakan crime News : कंपनीच्या शेडचे पत्रे उचकटून एक लाखांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 98 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वाघजाईनगर, चाकण येथील गुरुकृपा फॅब्रीकेटर्स कंपनीत उघडकीस आली.

संजय हरिभाऊ खंडागळे (वय 42, रा. आंबेठाण रोड, ता. खेड) यांनी याबाबत रविवारी (दि. 11) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण मधील वाघजाईनगर येथे फिर्यादी यांचे गुरुकृपा फॅब्रीकेटर्स ही कंपनी आहे. शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि. 10) सकाळी साडेनऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या शेडचे पत्रे उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीमधून केबल, वेल्डिंग मशीन टॉर्च, ग्राइंडर असे एकूण 98 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.