Chakan : कारमधून मोबाईल फोन चोरीला

Chakan: Mobile phone stolen from car

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेला मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी पुणे-नाशिक रोडवर आळंदी फाटा येथे घडली.

लोकेश लुर्झस डिसुझा (वय 30, रा. पिंपरी कॅम्प) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी फिर्यादी डिसुझा पुणे-नाशिक रोडवर आळंदी फाटा येथे चाकण वजनकाट्यासमोर थांबले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा दोन हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन कारच्या डॅशबोर्डवर ठेवला होता. डॅशबोर्डवर ठेवलेला मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी डिसुझा यांच्या नकळत चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.