Chakan News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कोरोनाचा पहिला बळी

संतोष झेंडे यांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष झेंडे यांचे कोरोनामुळे आज (दि.30) निधन झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

संतोष झेंडे यांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.

संतोष झेंडे सुरुवातीला मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, एमआयडीसी भोसरी येथे सेवा बजावली आहे. सध्या ते पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या चाकण विभागात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 34 पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 अधिका-यांनी तर 184 कर्मचा-यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

याव्यतिरिक्त बाहेरून पिंपरी-चिंचवड शहरात बंदोबस्तासाठी आलेल्या 10 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. यामुळे शहर पोलिसांत निराशेचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.