Chakan News : पी के फाउंडेशनमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृतीपर सायकल रॅलीतून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून चाकण येथील पी के फाऊंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पस, पी के ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस परिसरात व शासकीय वनपरिक्षेत्रामध्ये विविध 100 देशी वृक्षांची लागवड केली. त्याचबरोबर ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन पर्यावरण जनजागृतीपर रॅली काढली. ही रॅली पी के टेक्निकल कॅम्पस ते भामचंद्र डोंगर या मार्गावरून काढण्यात आली.
सायकल रॅली ही रोटरी क्लब ऑफ चाकण एअरपोर्ट प्रायोजित असून सकाळ यंग इन्स्पिरेटर नेटवर्क (यीन) हे युथ पार्टनर व पुणे लाईव्ह न्युज चॅनल हे या रॅलीसाठी मीडिया पार्टनर होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी पर्यावरणाच्या महत्वाबरोबर तरुण पिढीने फक्त फोटोसाठी वृक्षारोपण करू नये तर वृक्षांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी, असे आवाहन केले.त्याचबरोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.

रोटरी क्लब ऑफ चाकण एअरपोर्टचे अध्यक्ष हनुमंत कुटे व सेक्रेटरी गणेश गिरमे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
भामचंद्र डोंगरावरील शिलालेख व लेण्यांची माहिती प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रमोद बोराडे यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दिली. प्रसंगी पी के फाउंडेशनच्या सेक्रेटरी नंदाताई खांडेभराड व सर्व शिक्षक स्टाफ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.