Chakan Crime News : पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे शनिवारी (दि. 1) रात्री सात वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे.

मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. त्या महिलेचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष आहे. याप्रकरणी विशाल वसंत कुंभार (वय 32) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 1) रात्री सात वाजताच्या सुमारास अनोळखी महिला पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने महिलेला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर या अपघाताची माहिती न देता वाहन चालक पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.