Chakan : नागरिकाचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या नागरिकाचा (Chakan) फोन चोरून पळून जाणाऱ्या तिघांनाही चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.3) कडाचीवाडी, चाकण येथे घडली आहे.

कश्यप मकसुद सय्यद वय (वय 18 रा.चिखली), कमरुद्दीन आयुब चौधरी (वय19 रा.चिखली), साईनाथ सुरेश शेलार (वय 19 रा.चिंचोशी, खेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Bhosari : थकीत वेतनासाठी एमआयडीसीत कामगारांचे बेमुदत आंदोलन

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दिनेश राम वेदपाठक (वय 33, रा.कडाचीवाडी, खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पेट्रोलपंपावर काम करतात. ते कामावरून घरी पायी जात होते. यावेळी (Chakan) दुचाकीवरून आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला अडवून त्यांचा 10 हजार रुपयांचा फोन व 500 रुपये रोख बळजबरीने हिसकावून नेले.

चाकण पोलिसांनी फिर्यादीवरून तीनही आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.