Shirgaon : केवळ बघितले म्हणून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण

एमपीसी न्यूज : आमच्याकडे काय बघतोस म्हणत एका तरुणाला शिवीगाळ (Shirgaon) करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी (दि.3) चांदखेड, शिरगाव येथे घडली.  

याप्रकऱणी शिरगाव पोलीस ठाण्यात राकेश मधुकर वेणुरे (वय 30, रा. पाचणे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी बाळु मोठे (रा. चांदखेड, मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Chakan : नागरिकाचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी केले अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून त्यांच्या मित्रासोबत जात होते. यावेळी आरोपीने त्यांना काय बघतोस (Shirgaon) म्हणत शिवीगाळ केली. यावेळी शिवी का दिली म्हणून फिर्यादीने जाब विचारला असता आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादी व त्यांच्या मित्रालाही जखमी केले.

यावरून शिरगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.