Hinjawadi :अपघातात ट्रकचे चाक पोटावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी व कंटनेरच्या अपघातात ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या (Hinjawadi) पोटावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात भूगाव ते बावधन मार्गावर शुक्रवारी (दि.3) घडला आहे.

यामध्ये अनिल राघू भुरुक (वय 46 रा.भुगाव) यांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात(Hinjawadi) मयत अनिल यांचे पुतणे अमित अर्जून भुरुक (वय 30 रा.धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून टाटा हाय़वा (एमएच 14 सीयू 1100) वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : नागरिकाचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी केले अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते अनिल भुरुक हे दुचाकीवरून कर्वे रोड ला जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा भरधाव वेगात चालवून वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भुरूक यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात भुरुक हे खाली पडले व त्यांच्या पोटावरून ट्रकचे चाक गेले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.