Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 3 अधिकारी व 7 कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यातील 3 अधिकारी व 7 कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

ते म्हणाले, की सहाय्य्क पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक या रँकच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा पैठण येथे केल्याने बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाचा विरोध करण्यासाठी बहुजन महापुरुष सम्मान समितीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये धरणे आंदोलन केले आहे.

Talegaon : माणुसकी सांधणारा मानवतेचा सेतू म्हणजे दिगंबर दादा! – रामदास काकडे

संध्याकाळी चंदक्रांत पाटील श्रीमान महासाधू मोरया (Chandrakant Patil) गोसावी यांच्या समाधी महोत्सवाचे उदघाटन करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.