Chichwad : के. जे. गुप्ता ज्यूनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल

100 percent result of science branch of K. J. Gupta Junior : दोन विद्यार्थांनी 90 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचालित के जे गुप्ता ज्यू कॉलेजचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. येथील दोन विद्यार्थांनी 90 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.

कॉलेजने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावी परिक्षेत निशांत अहिरराव (90.92 %), मोनिका शेटे (90.77 %) आणि देवयानी जाधव – (87.53 %) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.

सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव यांनी देखील सर्व गुणवंत विद्यार्थ्याना पुढील उजवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व शिक्षक वर्गाचे देखील उत्कृष्ट निकालाबाबत अभिनंदन केले या वेळी कॉलेजचे प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, ज्यू कॉलेज विभाग प्रमुख अविनाश सावंत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.