Chikhali : चिखलीत एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला

एमपीसी न्यूज : चिखलीतील जाधववाडी येथील एचडीएफसी बँकेचे (Chikhali) एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता मात्र ते अपयशी ठरले. हा प्रकार बुधवारी (दि.24) घ़डला.
याप्रकरणी अज्ञात चोरा विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काचेच्या दरवाजातून एटीएममध्ये प्रवेश केला व डोअर पॅनल, हुड लॉक सोबत (Chikhali) टेस्टर व दगडाच्या सहाय्याने मशीन सोबत छेडछाड करत मशीनचे 6 हजार रुपयांचे नुकसान केले मात्र त्याला एटीएम मशीन फुटले नाही. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.