Chikhali : कुदळवाडीमधील कंपनीला आग; विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास

एमपीसी न्यूज – कुदळवाडी येथील मोरे पाटील चौकात एका कंपनीला ( Chikhali ) आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या आगीमध्ये रासायनिक पावडर जळाल्याने विषारी धूर तयार झाला. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला.

 

एच आय इंटरप्राईजेस या कंपनीत आग लागली. कमरुद्दिन रहमानी यांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्रातील सहा, भोसरी, मोशी, तळवडे, चिखली उप केंद्रातील प्रत्येकी एक असे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले.

 

Today’s Horoscope 18 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

कंपनीत ॲल्युमिनियम मेटल पावडर व अन्य रासायनिक पावडर असल्याने पाण्याचा उपयोग होत नव्हता. जवानांनी मोठ्या प्रमाणात फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासह दोन ते तीन ट्रॅक्टर रेती आगीवर पसरून आग आटोक्यात आणली.

 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीच्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. नाक आणि डोळ्यांची आग झाली. तसेच डोळ्यातून पाणी येण्याचा देखील नागरिकांना त्रास ( Chikhali )  झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.