Today’s Horoscope 18 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 18 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- रविवार.

तारीख – 18.02.2024.

शुभाशुभ विचार – 13 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – संध्याकाळी 4.30  ते  06.30 .

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – रोहिणी 9.23  पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी – वृषभ 21.54  पर्यंत नंतर मिथुन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – जांभळा)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. एखाद्या चर्चासत्रातील तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल. आज कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल.

वृषभ – ( शुभ रंग- मोतिया)

व्यवसायात भागीदारांमध्ये एकमत राहील. वैवाहिक जीवनात ही तू तिथे मी असे वातावरण असेल. प्रवासात काही काळ खोळंबा संभवतो. आज वादविवाद नकोच.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

आज कंजूषणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. कर्ज मंजुरीसाठी केलेले अर्ज काही कारणांनी रखडतील. प्रवासात सतर्क राहायला हवे.

कर्क – ( शुभ रंग – तांबडा)

कार्यक्षेत्रातील काही पेच प्रसंग सोडवण्यासाठी जुन्या ओळखी कामी येतील. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दाला मान राहील. काही रखडलेली येणी असतील तर वसूल होतील.

सिंह -( शुभ रंग – राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज फक्त कर्तव्याला प्राधान्य द्या.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज त्तुम्हाला हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. झटपट लाभाचा मोह आज टाळायला हवा. स्वतःवर संयम आवश्यक आहे.

तूळ – ( शुभ रंग- लाल)

आज काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात आज नको. आज आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या.

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात सुसंवाद महत्त्वाचा राहील.

धनु –  (शुभ रंग- क्रिंम)

नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून शाब्बासकी मिळेल. आज तुमची तब्येत थोडी नरम राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. वैवाहिक जीवनात गप्पच राहणे योग्य ठरेल.

मकर-  (शुभ रंग- निळा)

व्यापार उद्योगाला पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज प्रॉपर्टी विषयक व्यवहार लाभ देतील. आईने दिलेले सल्ले महत्त्वपूर्ण असतील.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल तरुणांनी व्यसने टाळावीत. कुसंगती पासून दूर राहावे. पासून दूर राहावे व्यसने टाळावीत.

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

धंद्यातील वेणी अनपेक्षितपणे वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असल्याने आज गुंतवणुकीस प्राधान्य द्या.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.