Chikhali : चिखली, जाधववाडी येथे जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज- चिखली, जाधववाडी येथे जुने टायर असलेल्या भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज, गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अग्निशामक दलाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली जाधववाडी येथे सिल्वर क्लब शेजारी जुने टायर असलेल्या भंगार मालाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी मुख्य केंद्राचे चार तर इतर तीन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास आणखी बंब पाठवण्यात येणार आहे. यामध्ये अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही. चिखलीत भंगार मालाच्या गोदामाला आग लागल्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.