Nigdi : महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज- चोरट्याने पादचारी महिलेच्या गळ्यातील 18 हजारांचे गंठण लंपास केले. बुधवारी (दि. 10) सकाळी साडे नऊच्या सुमारास आकुर्डी परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी ७५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या बुधवारी सकाळी आकुर्डी परिसरातून पायी जात होत्या. आकुर्डी भाजी मंडई समोरील रस्त्यावर आल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे 18 हजार रुपये किमतीचे गंठण हिसका मारून चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.