Sangvi : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केला. या प्रकरणी बुधवारी (दि. 10) पतीसह सासरच्यांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी एका 34 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सासरे , जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व आरोपी पती यांचा प्रेमविवाह झाला. त्यामुळे सासरच्यांनी आपापसात संगनमत करत त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. पीडितेला पहिले मुलगी झाल्याने तसेच इतर कारणांवरून पतीने तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. त्रास सहन न झाल्याने पीडितेने सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.