Bhosari : गुंतवणुकीच्या आमिषाने दीड लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज- जास्त परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणीला दीड लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी बुधवारी (दि. 10) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐश्वर्या किरण चावरे (वय 23, रा.भोसरी) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अंकित वानखेडे, गणेश ढोमसे, शर्वरी मालूष्ठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी आपापसात संगनमत करून चावरे यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत क्यूनेट कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी नोव्हेंबर २०१८ पासून १ लाख ५७ हजार रुपये गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा, कंपनीचे प्रॉडक्ट किंवा किंवा दिलेले पैसे परत न करता फसवणूक केली. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.