Chikhali : निलेश नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या (Chikhali) वाढदिवसानिमित्त निलेशदादा नेवाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि.29) मोफत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे.(Chikhali) त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

आयुष्मान भारत कार्डचे वाटपही केले जाणार आहे. शिवतेजनगर येथील चेरी चौकात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.

PMC : गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

 

या शिबिराचा परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.