Pimpri : इमारतीच्या रिडेव्हलपमेंटचा नागरिकांना त्रास, रस्त्यावर राडारोडा; ये-जा करण्यास अडथळा

एमपीसी न्यूज – अजमेरा मासळूकर कॉलनीतील (Pimpri ) एका इमारतीचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) केला जात असून बांधकामाचा राडारोडा, खडी सार्वजनिक रस्त्यावर टाकण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी शैलेश मोरे यांनी केली. याबाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर देखील त्यांनी तक्रार केली आहे.

याबाबतची अधिक माहिती देताना मोरे म्हणाले, मासूळकर कॉलनीतील पूर्वीच्या सुखवानी पार्कचे रिडेव्हलपमेंटचे काम चालू आहे. या कामासाठीचे साहित्य सार्वजनिक रस्त्यावर मध्यभागी टाकले आहे. खडी, वाळू, लाकडे, खडी मशिन रस्त्यावर उभी केली आहे. या साहित्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करता येत नाही. धोकादायकरित्या ये-जा करावी लागत आहे. चेंबरचे झाकणही तुटले आहे. त्यावर फळी टाकण्यात आली. एखाद्याचा फळीवर पाय पडला आणि फळी तुटल्यास चेंबरमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

PMC : गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या आहे. त्यांना रस्त्याने ये-जा करता येत नाही. सकाळी आठ वाजताच कामाला सुरुवात केली जाते. दिवसभर कामाचा आवाज येतो. परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. सकाळी नऊनंतर काम सुरु करावे. रविवारीही काम सुरु असते.

परिसरातील नागरिकांना रविवारी देखील आवाजामुळे आराम (Pimpri) करता येत नाही. त्यामुळे रविवारी काम बंद ठेवावे. रस्त्यावरील साहित्य बाजूल करुन रस्ता नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोकळा करावा, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकले असताना महापालिका प्रशासन यावर कारवाई का करत नाही असा संतापही त्यांनी व्यक्त केला. याबाबत सारथी हेल्पलाईनवर तक्रार केली आहे. प्रशासनाच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.