Chikhali News : चिखलीत शिवजयंतीनिमित्त महारक्तदान, मधुमेह, स्त्रीरोग तपासणी शिबीर

कोरोनामुळे यंदा साधेपणाने शिवजयंती साजरी, मिरवणूक रद्द, सामाजिक उक्रमांवर विशेष भर

एमपीसीन्यूज : श्री क्षेत्र टाळगांव चिखली येथे ‘एक गाव एक शिवजयंती उत्सव’ यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षीच्या मोठ्या कार्यक्रमास फाटा देत यंदा समाजोपयोगी उपक्रमावर भर देण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून चिखली येथील छत्रपती शिवाजी माराज चौकात महारक्तदान शिबिर, मधुमेह तपासणी व स्त्रीरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबीराचे उद्घाटन केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख, माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह कुंदन गायकवाड, संभाजी बालघरे, गणेश भुजबळ, अकुंश मळेकर, दिनेश यादव, संतोष मोरे, सरिता नेवाळे, अँड. वर्षा मोरे, जितेंद्र यादव, विकास साने, निलेश लोखंडे, गीताराम मोरे,अमृत सोनवणे, काळुराम यादव, विक्रम मोरे, विष्णु भुजबळ आदी उपस्थित होते.

एक गाव एक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात अनेक नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर स्त्रीरोग तपासणी शिबीरास महिलांचा प्रतिसाद उत्तम मिळाला.

सूत्रसंचलन शशिकांत पुंड यांनी केले. आभार शिवाजी अंबिके यांनी मानले.

पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा वेळेस नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्यवेळी रक्त मिळाल्यास त्यांना जीवनदान मिळू शकते. यासाठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे ऱक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. चिखलीच्या एक गाव एक शिवजयंती उपक्रमांचा आदर्श इतर मंडळांनी घ्यायला हवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.