chikhali News : प्रलंबित कामे पूर्ण केल्याशिवाय ‘बीआरटी’ सुरु करु नये – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : काळेवाडी ते चिखली ( Kalewadi To Chikhali) हा बीआरटीएस (BRTS)  मार्ग सुरू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गावरील अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. ती कामे पूर्ण केल्याशिवाय या मार्गावरुन एकही बस जाऊ देणार नाही, असा इशारा स्वीकृत सदस्य दिनेश यादव (Dinesh yadav)  यांनी दिला आहे.

या संदर्भात यादव यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर ( Pcmc Commissioner shravan Hardikar) यांना निवेदन दिले आहे. चिखली तसेच कुदळवाडी भागातील बीआरटीएस मार्गावर अनेक अडचणी असून त्यांची सोडवणूक करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

कुदळवाडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पदपथ नादुरुस्त आहेत. कुदळवाडी ते मोई फाटा मार्गावर नो पार्किंग फलक नाहीत. दुभाजकाची अवस्था दयनीय आहे.

याशिवाय या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. ड्रेनेज तसेच स्टॉर्म वॉटरची व्यवस्था केलेली नाही. त्याचबरोबर बस थांब्यावर वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना बसची माहिती कशी मिळणार ?असा सवाल यादव यांनी केला आहे.

प्रशासनाने बीआरटीएस मार्ग सुरू करण्याची घाई करु नये. मार्गावरील प्रलंबित कामे आधी पूर्ण करावी. त्यानंतरच बस वाहतूक सुरु करावी, अशी मागणीही यादव यांनी केली आहे.

दरम्यान, चिखली आणि कुदळवाडी भागातील विकासकामांना महापालिका प्रशासनाकडून दूजाभाव मिळत असल्याची या भागातील नागरिकांची भावना आहे. नेमकी हीच भावना यादव यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

यादव यांनी स्थानिक जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून यादव यांच्या प्रत्येक भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.