Chikhali News : बेकायदेशीरपणे गॅस चोरी करून शासन व ग्राहकांची फसवणूक, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे एका सिलेंडरमधून दुस-या सिलेंडरमध्ये गॅस चोरी करून शासनाची आणि ग्राहकांची फसवणूक केली. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सायंकाळी सव्वासहा वाजता मोरेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.

दुकान मालक अजय राजेंद्र जैन (वय 32, रा. पाटीलनगर, चिखली), कामगार सागर सुरेश तरकसे (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकोडा मेटल्स एंड गॅस सर्विस सेंटर नावाच्या दुकानाच्या मोकळ्या जागेत आरोपींनी मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून चोरी केली. याचा कोणताही कायदेशीर परवाना आरोपींकडे नाही. यातून आरोपींनी शासनाची व ग्राहकांची फसवणूक केली. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 66 हजार 90 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.