Chikhali News : प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा- आमदार महेश लांडगे

एमपीसीन्यूज : कोरोना संकटात छोट्या विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून दहा हजार रुपये कर्जरूपाने उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी चिखली-कुदळवाडी  येथे केले.

स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या कुदळवाडी जनसंपर्क कार्यालयात आजपासून ( गुरुवारी) प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृती करण्यास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाचे उदघाटन आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शैलेश मोरे, रमेश मोरे, कोंडीबा यादव, दिलीप यादव, आकाश किवळे, विवेक गुप्ता, काका शेळके,  किशोर लोंढे,  प्रकाश चौधरी, मुकेश मोरे, विनोद बिराजदार, स्वराज पिंजण, वैभव वाघ आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री पथविक्रेता (फेरीवाला) आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरवस्ती विकास योजना विभागाच्यावतीने कुदळवाडी येथे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी 5 वा या कालावधीत कर्ज मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत.

या कार्यालयात विक्री परवाना नसलेल्या विक्रेत्यांचे नगर पथविक्रेता शिफारस पत्र मिळण्यासाठीही अर्ज भरून घेतले जात आहेत.

त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे हातगाडी व स्टॉलचे लायसन्स आहे अशा विक्रेत्यांचे पूर्ण अर्ज भरून घेतले जात आहेत. शिवाय या योजनेविषयी मार्गदर्शन केले जात आहे. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी आमदार महेशदादा लांडगे युवा मंच वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

पहिल्याच दिवशी अनेक विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.