Chikhali News : रस्ता सोड म्हटल्याने चौघांकडून दोघांना मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज – रस्ता सोड, आम्हाला जायच आहे, असे म्हटल्याने चौघांकडून दोघांना मारहाण करण्यात आली. त्यापैकी  एकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. सावकार चौक, मोरेवस्ती, चिखली येथे गुरूवारी (दि. 14) रात्री 8.30 वा ही घटना घडली.

तुषार शिंदे उर्फ बारक्या, पपड्या (पूर्ण नाव माहित नाही), अजय भरत जाधव (वय 24, रा. चिखली) आणि धम्मपाल उर्फ ढम्या या चौघांविरोधात भारतीय दंड विधान 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अजय भरत जाधव याला अटक केली आहे.

याबाबत लखन उर्फ लक्ष्मण बसवराव गाडेकर (वय 24, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून जात होते. त्यावेळी सावकार चौक, मोरेवस्ती, चिखली येथे रस्त्यावर गर्दी असल्याने हॉर्न वाजवले त्यावर आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला हॉर्न का वाजवतो असे विचारले. त्यावर फिर्यादी रस्ता सोड आम्हाला जायचं आहे असे म्हणाले. त्यामुळे राग आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्र याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात दगड मारल्याने रक्तस्त्राव झाला. पुन्हा या रस्त्यावर दिसला तर याद राखा अशी धमकी देऊन दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले,  असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी  एक जण अटक असून, चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.