Kothrud News: कॉसमिक बिट्स स्टुडियोचे दिमाखात उद्घाटन

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील सुप्रसिद्ध बेडेकर गणपती मंदिराच्या समोर असलेल्या सर्व कलेने समृद्ध आणि सुसज्ज असलेल्या ख्यातनाम तबलावादक  अमित जोशी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची म्हणजेच कॉसमिक बिट्स स्टुडियोची वाटचाल आता वाऱ्याच्या वेगाने होत आहे. कॉसमिक बिट्स स्टुडियोचे आज (शनिवारी) दिमाखात उद्घाटन झाले.

संगीत ,चित्रपट आणि इतर क्षेत्रातील मोठमोठे मान्यवर सध्या येथे भेट देत आहे. नुसती भेटच नव्हे तर या सुसज्ज दालनाला भेट देऊन तंत्रज्ञाच्या मदतीने आपले मोलाचे कार्य परिपूर्ण रीतीने करून घेत आहेत. तसेच येथे असलेल्या सुविधांवर बेहद्द खुश ही आहेत. कॉसमिक बीट्स या स्टुडियो बरोबर भविष्यात अनेक मोठमोठ्या योजना कार्यन्वित करण्याच्या तयारीत कॉसमिक बिट्सची संपूर्ण टीम कार्यरत आहे. नुकतेच या स्टुडियोमध्ये तौफिक कुरेशी हे एक तबलावादक असून निसर्गातील विविध वस्तूंमधून तबल्याचे बोल काढणारे ते एक पर्कशनिस्ट असलेले चित्रपट आणि  संगीत क्षेत्रातील दिग्गज यांनी नुकतीच भेट दिली.

कॉसमिक बिट्स येथे असलेल्या सुविधांचा आस्वाद घेत ते बेहद्द खुश झाले. विशेषतः येथे एकाच वेळी होत असलेल्या व्हिडियो, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि ध्वनी संकलनाच्या यंत्रणेवर तौफिक यांनी समाधान व्यक्त केले. ज्यांनी चित्रपट क्षेत्रातील ए आर रेहमान सारख्या दिग्गज संगीतकार यांच्याबरोबर जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या स्टुडियोमध्ये अजरामर कलाकृतींना जन्म दिलाय अशांना हा स्टुडिओ आवडणे हे विशेषच म्हणावे लागेल. तसेच कॉसमिक बिट्स स्टुडिओजची महती कळल्यावर जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतविषयक कार्यशाळा घेण्याची इच्छा व्यक्त केली. आणि लवकरच त्यांची कार्यशाळा कॉसमिक बिट्स येथे होणार आहे.

कॉसमिक बिट्स स्टुडियोजचे निर्माते संगीतकार अमित जोशी यांनी सांगितले की, कलाकार म्हणून त्यांना असे जाणवले की आपण कलेमध्ये भरीव योगदान देण्यासाठीच या स्टुडियोची निर्मिती करत आहोत. आपल्याप्रमाणेच इतरही कलाकारांना योग्य हक्काचे व्यासपीठ देण्याचा मानस असल्याचे जोशी नमूद करतात. यात अमित जोशी यांची आजी तसेच आई अपर्णा जोशी यांची मोलाची साथ मिळाली. इतरही अनेकांनी मोलाची मदत केल्यानेच हे होऊ शकले, असेही जोशी नमूद करतात. तसेच स्टुडियो संदर्भात योग्य नियोजन करण्यासाठी प्रा. अभय कंद यांची अतुलनीय साथ लाभली.

या कॉसमिक बिट्स स्टुडियोजमध्ये ऑडियोच फक्त नसून आधुनिक पद्धतीने (क्रोमा) व्ही एफ एक्स व्हिडियो करण्याची सोय करण्यात आली आहे. एक संपूर्ण चित्रपट एकाच छताखाली करण्याचा संकल्प इथेच पूर्ण होऊ शकतो. तसेच नवनवीन कलाकारांना योग्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प ही कॉसमिक बिट्स स्टुडिओ आणि अमित जोशी म्युजिक अकादमी यांचा आहे. सुजाण कलेचे जाणकार  पुणेकर रसिक याला नक्कीच सकारात्मक आणि सक्रिय पाठींबा देतील, असा विश्वास अमित जोशी आणि कॉसमिक बिट्सच्या टीमने व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.