Ravet News : वॉचमनची नोकरी करण्यावरुन दगडाने ठेचून इसमाचा खून 

एमपीसी न्यूज – वॉचमनची नोकरी करण्यावरुन झालेल्या वादात  एका  इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. रावेत येथील कोहीनूर बिल्डिंगच्या मागे शुक्रवारी (दि. 16) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

 

बिट्टू यादव उर्फ ऋषीपाल सिंह सुरेंद्र सिंह (वय 46, रा. इटावा, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. संजय दामोदर चौहाण (रा. महु, मध्य प्रदेश) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बिट्टू यादव वॉचमनचे काम करत असलेल्या जागेवर आरोपी संजय चौहाण याला काम करायचे होते. यावरून शुक्रवारी (दि. 15) रात्री नऊ वाजता दोघांमध्ये भांडण झाले. या रागातून आरोपीने बिट्टू यादव याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.