Chikhali : विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून कार्य करणा-या विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने चैत्र नवरात्री महोत्सवाच्या पवित्र मुहूर्तावर शनिवारी (दि. 13 एप्रिल) श्रीराम नवमी निमित्त साने चौक चिखली येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी केले होते. 
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी 8 वाजल्या पासून अखंड श्रीराम चरित्र मानस ग्रंथाचे पठण करण्यात आले. शनिवारी दुपारी प्रतापगड येथील रामचरित्र मानस मंडळाच्या वतीने भजन सेवा करण्यात आली होती. होमहवनाचे पौरोहित्य विनोद पांडे, विनोद तिवारी, रामबचन साही यांनी केले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, पीएसआय अहिरे व भक्त भाविक बहूसंख्येने उपस्थित होते. महाप्रसाद व वस्त्रदान करण्यात आले. दुपारी चिखलीतील साने चौक, कृष्णा नगर, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती या परिसरातून पालखी प्रदक्षिणा करण्यात आली.

  • श्रीराम जन्मोत्सवाच्या आयोजनात संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, अध्यक्ष रामानंद यादव, उपाध्यक्ष रवींद्र यादव, कार्याध्यक्ष अजय यादव, उपकार्याध्यक्ष कृपाशंकर यादव, सचिव रवी गुप्ता, उपसचिव रवींद्र यादव, उपखजिनदार वीरेंद्र यादव, विनोद पांडे, अद्यप्रसाद चतुर्वेदी, निरज शाही, विजय कड, प्रमोद गुप्ता, प्रदीप मिश्रा, अक्रम शेख, मुजफ्फर इनामदार, डॉ. पंकज गुप्ता, शिवनाथ कुंभार, राहुल गुप्ता, रामबचन साही, शाम सुंदर गुप्ता, आनंद गुप्ता, सत्यन गुप्ता, विनोद गुप्ता, राजकुमार गुप्ता, आदित्य कुमार आदींनी सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.