Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा फलकावरील राजकीय नेत्यांचे फोटो झाकले

आचारसंहितेची अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणा-या पिंपरीतील फलकावरील नेत्यांचे फोटो झाकले आहेत. निवडणूक अधिका-यांनी आज (शनिवारी) नेत्यांचे फोटो वर्तमानपत्राच्या कागदांनी झाकले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आचारसंहिता असल्याने नेत्यांचे फलक लावले जात नाहीत. त्याच्या माध्यमातून त्यांची जाहिरात होते. नागरिकांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो. त्यासाठी आचारसंहितेत नेत्यांचे फलक लावले जात नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या (रविवारी) जयंती आहे. जंयतीनिमित्त विविध संस्थांनी जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. ज्या फलकांवर राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. ते फोटो निवडणूक अधिका-यांनी झाकले आहेत.

  • दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चार दिवसांपासून पिंपरी येथे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.