Chikhli : गडचिरोली येथील आदिवासी बांधवासाठी दिवाळीचा फराळ

एमपीसी न्यूज – सोनम रवी जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त गडचिरोली येथील आदिवासी बांधवासाठी जुने वापरायोग्य कपडे व दिवाळीचा फराळ, साखर अशी मदत करण्यात आली. या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

भरपुर कपडे व साड्या, लहान मुलांचे कपडे, 150 किलो साखर, 50 किलो गहू, तांदूळ 20 किलो, साबुदाणा 5 किलो, चहा पावडर, बिस्कीट अशी मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. जाधववाडी, आहेरवाडी, सेक्टर 16, चिखली मोशी येथील नागरिकांनी ही भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.