Chinchwad : शाहूनगर, संभाजीनगर भागात ‘एक गाव, एक शिवजयंती’; 45 मंडळांचा सहभाग

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथे ‘एक गाव, एक शिवजयंती’ साजरी करण्याचा निर्णय 45 मंडळांनी घेतला आहे. यामध्ये शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर तसेच गणेश उत्सव, नवरात्री मंडळ, हौसिंग सोसायटी संस्था, महिला मंडळ, बचतगट, हरिपाठ मंडळ, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व संघटना यांच्या एकत्रित सहभागाने  शिवजयंती साजरी होणार आहे.

 

शिवजयंती निमित्त गुरूवारी (दि.12) सायंकाळी शनी मंदिर मैदान पूर्णानगर ते बहिरवाडे मैदान शाहूनगर दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत शिवरायांचा रथ, वारकरी भजनी मंडळ, ऐतिहासिक सजविलेले रथ, कमानी, साउंड सिस्टीम, छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत 101 बाल, मावळ्यांच्या वेशभूषेत 101 तरुण, पारंपरिक वेशभूषेत 101 तरुणी व महिलांचा सहभाग असणार आहे.

 

या मिरवणुकीत सहभागी सर्व पुरुष महिला भगवा फेटा घालणार आहेत. संपूर्ण मिरवणूक मार्गावर व सर्व चौकात भगवा ध्वज व  ढोलपथक, अश्वारूढ मावळे सहभागी होणार आहेत. मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर व पूर्णानगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.