Chinchwad : जिल्ह्यात 72 टक्के लोकांचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक; शिधापत्रिकेवरील धान्याची माहिती मिळणार मोबाइलवर
एमपीसी न्यूज – शिधापत्रिकेवरील धान्य नेमून दिलेल्या (Chinchwad) प्रमाणात मिळतेय, याची अनेकांना खात्री नसते. तुमच्यासाठी ठरलेल्या धान्याच्या कोटा आणि तुम्ही किती धान्य घेतले, याचा ‘एसएमएस’ देण्यासाठी रेशनकार्डाला मोबाइल क्रमांक जोडण्याची मोहीम सुरू आहे. पुणे जिल्ह्यात 72 टक्के रेशनकार्डांना मोबाइल क्रमांक जोडला आहे.
जिल्ह्यात 6 लाख 11 हजार 880 रेशनकार्डधारक असून त्यापैकी 4 लाख 42 हजार 338 रेशनकार्डला मोबाइल क्रमांक जोडला. याची टक्केवारी 72.29 आहे. धान्य घेतल्याचा एसएमएस मिळाल्याने तुमच्या हक्काचे धान्य तुम्हालाच मिळाले, याची खात्री होईल. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या मापात पापाचे वाटेकरी कोण, हे कळू शकेल. परिणामी, ग्राहकांच्या तक्रारी कमी होतील.
Kuruli : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी काय कराल?
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व रेशनकार्डधारकांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य घेताना आपला मोबाइल क्रमांक ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचा ठसा देऊन अद्ययावत करावा. त्यानंतर कार्डधारकांना किती (Chinchwad) धान्य मिळाले, याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर मिळेल.
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत आवटे म्हणाले, “शिधापत्रिकांना शिधापत्रिका धारकांचा मोबाइल क्रमांक जोडण्याचे काम सुरू आहे. त्यात शिधापत्रिकेवरील किमान एकाचा तसेच सर्व सदस्यांचे मोबाइल क्रमांक जोडत आहेत. नागरिकांनी आपल्या रेशनकार्डावरील सर्व सदस्यांचे मोबाइल क्रमांक जोडून घ्यावेत.”
बारामती 90023 79931
खेड 63963 50919
हवेली 24200 19107
पुरंदर 39316 29486
दौंड 56646 42974
मुळशी 20290 15229
भोर 28233 20417
वेल्हे 7985 5768
इंदापूर 70514 48566
शिरूर 54226 36286
आंबेगाव 47680 29898
जुन्नर 69945 41420
मावळ 38859 21959
एकूण 611880 442338