Chinchwad : महागाई विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन

एमपीसी न्यूज : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर तर्फे (Chinchwad) रविवारी 5 मार्च रोजी सिलेंडरच्या वाढीव किंमती विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. एलपीजी सिलेंडर घरगुती 50 रुपये आणि कमर्शिअल सिलेंडरवर 350 रुपये वाढ करण्यात आली आहे. या विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळेस आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनुप शर्मा यांनी आपले मत मांडताना म्हंटले, की अंबानी आणि अडाणी यांचे लाखो कोटीचे कर्ज मोदी सरकारने माफ केले आणि आता सामान्य जनतेच्या खिशावर कात्री लावली आहे. सिलेंडर महाग झाले, दूध महाग झाले. बऱ्याच वस्तू महाग झाल्या तरी मोदी सरकारने सांगावे की मध्यमवर्ग आणि गरीब जनतेने जगावे की नाही.

जे बोलत होते 2014 च्या अगोदर बहुत हुई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार आता याचा अर्थ असा झाला आहे बहुत हुई महंगाई की मार आपकी बार बस कर यार.

आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार पाटील बोलले, की  बेरोजगारी दर 40 वर्षापेक्षा अधिक झालेली आहे.  त्यावर हे काही बोलत नाहीत. महागाई मागील 6 वर्षात रेकॉर्ड स्तरावर (Chinchwad) पोहोचलेली आहे. अडाणीने एवढा मोठा घोटाळा केला, त्यावर मोदी सरकार काही बोलत नाही. परंतु, सामान्य जनतेचा जीव घेण्याचे काम मात्र करत आहे.

Pune News : होळी पौर्णिमेच्या दिवशी गोळीबार, वेल्ह्यात तरुणाचा गोळ्या झाडून खून

आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विंग पुणे जिल्हा अध्यक्ष वहाब शेख बोलले, की हे सरकार हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करतात आणि मेन मुद्द्यावरून सामान्य जनतेचे दिशाभूल करतात. मेन मुद्दा काय आहे? सर्वसामान्य जनतेला चांगले शिक्षण, चांगली चिकित्सा व स्त्रियांसाठी मोफत बस सेवा; जसे दिल्लीत चालू आहे तसे द्यायला पाहिजे. पण ते सगळं सोडून फक्त सामान्य जनतेची दिशाभूल करणारे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही.

जसे 2014 मध्ये जनतेने यांना निवडून दिले होते. तसेच 2024 मध्ये हीच जनता त्यांना जमिनीवर काढून पाडणार.
आम आदमी पार्टी महिला आघाडी अध्यक्ष स्मिता पवार यावर बोलल्या, की सामान्य जनतेचा मोदी सरकारवरून भंग झालेला आहे. तुम्ही विचार करा, आजच्या वेळेला एक सामान्य गृहिणी जे घर चालवते; त्याची काय अवस्था झाली असेल? गॅस महाग झाला, दूध महाग झाले, गोड तेल महाग झाले, आता आमच्यासारख्या सामान्य गृहिणी घर चालवू शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.