Chinchwad : ज्युसचे पैसे मागितल्यावरून दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज- ज्यूस प्यायल्यानंतर दुकानदाराने ग्राहकांकडे ज्यूसचे पैसे मागितले. यावरून दोघांनी मिळून दुकानदारालाच लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना चिंचवड डी मार्ट समोर गुरुवारी (दि.7) रात्री घडली.

मुराद अब्बास अली मुल्ला (वय 35, रा.चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दानिश अन्सारी (वय 25, रा. चिंचवड), बबलु उर्फ रिजवान कुरेशी (वय 26, रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुल्ला यांचे डी मार्ट समोर ज्यूस सेंटर आहे. गुरुवारी रात्री आरोपी यांच्या ज्युस सेंटरवर आले. आरोपींनी ज्यूस घेतला. त्याचे पैसे फिर्यादी यांनी मागितले. त्यावरून आरोपींनी मुल्ला यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.