Chinchwad Bye-Election : 2 हजार 907 मतदान यंत्रे सीलबंद

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीच्या प्रत्यक्ष (Chinchwad Bye-Election) मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणुकीसाठी 714 कंट्रोल युनिट, 1428 बॅलेट युनिट आणि 765 व्हीव्हीपॅट अशा एकूण 2 हजार 907 मतदान यंत्रांचे सिलिंग करण्यात आले आहे.

तीन दिवस चाललेल्या या प्रक्रीयेनंतर सर्व मतदान यंत्रे थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. ही रूम सीलबंद करण्यात आली आहे. याठिकाणी सुरक्षेविषयक सर्व काळजी घेण्यात आली. पुरेसा पोलीस बंदोबस्तदेखील येथे ठेवण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

Chinchwad Bye Election : एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार – राहुल कलाटे

ईव्हीएम सिलिंग कामकाजात सहायक निवडणूक (Chinchwad Bye-Election) निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, माध्यम कक्ष समन्वयक किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्यासह भेल इलेक्ट्रॉनिक्सचे तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी यांचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.