Chinchwad Bye-Election : मतमोजणीमुळे जमावबंदी व मोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरातील दुकाने राहणार बंद

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मत मोजणी उद्या (Chinchwad Bye-Election) (दि.2) होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चिंचवड, वाकड, सांगवी, हिंजवडी,देहूरोड, रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक शांततेला आणि मालमत्तेला धोका होणार नाही, याची खबरदारी म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मतदान झाल्यानंतर मतपेट्या थेरगाव येथील स्वर्गीय शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. इथेच गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मतमोजणीच्या 200 मीटर परिसरात गुरुवारी मध्यरात्री बारा पासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले आहेत. चिंचवड विधानसभा क्षेत्रात चिंचवड, वाकड, सांगवी, हिंजवडी, देहूरोड, रावेत पोलीस ठाण्याचा परिसर येतो.

मतमोजणी झाल्यानंतर सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हॉटेल, ढाबे, लॉजेस, दुकाने, पानटपऱ्या व इतर सर्व आस्थापना (Chinchwad Bye-Election) (अत्यावश्यक सेवा वगळून) गुरुवारी रात्री दहा ते शुक्रवारी सकाळी सात पर्यंत बंद ठेवण्याचे देखील आदेश दिले आहेत.

Chinchwad Bye-Election : मतमोजणीची तयारी पूर्ण; गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.