Chinchwad Bye Election: राजकीय पक्षांचे फ्लेक्‍स तत्काळ काढा; उपजिल्हाधिका-यांचे महापालिकेला पत्र

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या (Chinchwad Bye Election) पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्‍स, बोर्ड तत्काळ काढावेत. राजकीय फ्लेक्‍स काढल्यानंतर त्याचा अहवाल सादर करावा,  अशा सूचना उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी महापालिकेला दिल्या आहेत. याबाबत उपायुक्त सचिन ढोले यांना पत्र पाठविले आहे.

चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजे 18 जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यादिवसापासून आदर्श (Chinchwad Bye Election) आचारसंहिता सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.

Chinchwad Bye Election : पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी घेणार पूर्वतयारी आढावा बैठक

निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात काही राजकीय फ्लेक्‍स अद्याप जैसे थे आहेत. चिंचवड भागात राजकीय अद्यापही राजकीय फलक झळकताना दिसतात.

त्यापार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी महापालिका उपायुक्त सचिन ढोले यांना सोमवार (दि.23) रोजी पत्र पाठविले आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील सर्व राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्‍स, बोर्ड तत्काळ काढून त्याचा अहवाल सादर करावा, असेही  पत्रात म्हटले आहे.

https://youtu.be/PHqj5ghwm0A

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.