Chinchwad Bye Election : भावनिकतेवर नव्हे विकासकामांच्या जोरावर निवडणूक जिंकू – रोहित पाटील

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक (Chinchwad Bye-Election) राष्ट्रवादी काँग्रेस भावनिकतेवर नव्हे तर विकासकामांच्या जोरावर जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ पुनावळे येथे कोपरा सभा झाली. माजी नगरसेवक मयूर कलाटे, रेखा दर्शिले, संदीप पवार, सुप्रिया पवार, विजय दर्शिले, माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे, सागर ओव्हाळ, राजाराम काटे, प्रकाश काटे, सुरेश रानवडे, किरण बोरगे, सुभाष कोयते, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, ईश्वर ओव्हाळ, राजेंद्र गायकवाड, शांताराम बोडके, बाळासाहेब बोडके, अक्षय भुजबळ, श्रीकांत ढवळे, सुनील ढवळे यांच्यासह पुनावळेतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Pimpri News : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज मध्ये शिवजयंती साजरी

भारतीय जनता पक्षाच्या कुटनीतीमुळे शिवसैनिक प्रचंड दुखावला आहे. खोके सरकारच्या मदतीने शिवसैनिकात फूट पाडणाऱ्या भाजपचा चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. यावेळी आमचा पक्ष हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहे, असे ज्येष्ठ शिवसैनिक तारामल (Chinchwad Bye-Election) कलाटे यांनी म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना पुनावळे, ताथवडे आणि आमच्या हक्काच्या वाकड परिसरातून महाविकास आघाडीचे 5 हजारापेक्षा जास्त मताचे लीड देणार असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.