Chakan News : चाकण-शिक्रापूर रोड येथे कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  चाकण-शिक्रापूर रोड ने जाणाऱ्या दुचाकीला ( Chakan News ) एका कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.18) सकाळी अकरा वाजता साबळेवाडी येथे घडला.

सुभाष दत्तात्रय साळुंके (वय 54, रा. बहुळ, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दशरथ रामभाऊ वाडेकर (वय 58, रा. बहुळ, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 15/सीके 2850) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimpri News : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज मध्ये शिवजयंती साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर आणि त्यांचा मित्र सुभाष साळुंके हे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोड ने जात होते. साबळेवाडी गावाजवळ आल्यानंतर वाडेकर यांच्या दुचाकीला पाठीमागून एका कंटेनरने धडक दिली. त्यात सुभाष साळुंके यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.