Pimpri News : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज मध्ये शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा इंटरनॅशनल (Pimpri News ) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. 

शिवजयंती निमित्त विद्यालयात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात छोट्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांनी शिवचरित्राची माहिती दिली तर विद्यार्थी ईशान गाडेकर व शिवराज निलांगी यांनी तालासुरात पोवाडा सादर केला.

यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस व उपमुख्याध्यापिका लिजा सोजू उपस्थित होत्या.

 

Junnar News : जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात 100 कोटी – पर्यटन मंत्री

मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून साहसी व शूर होण्याविषयी शिकवण घेण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आरती सुतार यांनी केले. (Pimpri News )क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.