Board Exams : राज्यात उद्यापासून 12 वीच्या परीक्षा सुरू

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्यापासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. (Board Exams) गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली असून, 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर 14 लाख 57 हजार 282 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. परीक्षेच्या तयारीबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक या वेळी उपस्थित होत्या.

कोरोना महामारीनंतर सर्व सुरुळीत असताना पहिल्यांदाच ऑफलाईन वर्ग घेऊन बारावीची परीक्षा होत आहे. मधल्या दोन वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देता आली नाही.त्यामुळे यंदा 6, 64, 461 मुली तर 7 लाखांच्या आसपास मुलं परिक्षेला बसले आहेत.

Sangvi Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून 4 तोळ्याचे दागिने चोरीला

गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांनी घरुनचं परीक्षा दिली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कॅमेरे सुरू असतानाही कॉपी करत परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदा कॉपी मुक्त अभियान सतर्कतेने राबवण्यात येणार आहे.(Board Exams) भरारी पथक आणि बैठी पथक केंद्रांवर असणार आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटीची 10 मिनिटं वाढवून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची पूर्ण तयारी झाली आहे.

या’ नियमांचे पालन करावे लागणार

प्रत्येक केंद्रावर 50 मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही.

प्रत्येक परीक्षा केंद्रापासून 50 मीटर अंतरावर झेरॉक्सचे दुकान बंद.

सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडीमध्ये नेताना जी पी एस लावण्यात येणार.

उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा बारावीचं प्रॅक्टिकल पार पडणार.

कुठलेही कॅालेज राहिले असतील तर थेरीनंतर प्रॅक्टिकल देता येणार.

परीक्षा केंद्रावर कलम 144 अंतर्गत आदेश लागू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.