Sangvi Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून 4 तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज –  फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी सुमारे चार तोळ्याचे ( Sangvi Crime News ) दागिने चोरून नेले आहेत. हि चोरी शनिवार (दि.18) ते शुक्रवारी (दि.19) या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली आहे.

याप्रकरणी दिपक बलराम यादव (वय 39 रा.जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad Bye Election :  अश्विनी जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – रामदास आठवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना आरोपीने घराचे कुलुप तोडले, घरात प्रवेश करत कपाटातून 44 ग्रॅम वजनाचे 88 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सांगवी पोलीस आरोपीचा शोध घेत ( Sangvi Crime News ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.