Chinchwad Bye Election :  अश्विनी जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप ( Chinchwad Bye Election ) यांनी रिपब्लिकन पक्षाला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरी जनतेला केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवडमधील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला भाजप उमेदवार अश्विनी जगताप, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, कुणाल वाव्हळकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.

 

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, तो उमेदवार शंभर टक्के विजयी होतो. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षासोबत जोडलेल्या गेलेल्या सर्व घटकांनी अश्विनी जगताप यांच्या प्रचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्यावी.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे नेते होते. ते केवळ राजकारण करणारे नव्हते, तर समाजकारण करणारे नेते होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षालाही नेहमीच मदत केली. आता त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आपल्याकडून त्यांना ( Chinchwad Bye Election ) मदत झाली पाहिजे, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या पदाधिका-यांना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.