Pune : ….तर आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री करू – रामदास आठवले

एमपीसी न्यूज :  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची चांगली मैत्री आहे.तसेच यापूर्वी देखील त्या दोघांनी एकत्रित शपथ घेतली आहे. (Pune) त्यामुळे अजित पवार हे पुन्हा भाजप सोबत जाणार नाही.जर माझ्या पक्षासोबत अजित पवार आल्यास मला खूप आनंद होईल आणि आम्ही अजित पवार यांना मुख्यमंत्री करू अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली. आता रामदास आठवले यांच्या ऑफरवर अजित पवार हे नेमकी काय भूमिका मांडतात ते पहावे लागणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची रिपाइं नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट घेतली. त्यावेळी गिरीश बापट यांच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला.त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी अनेक घडामोडी बाबत भाष्य देखील केले.

Pune : बुधवारी रात्री पुण्यात आगीच्या दोन घटना , सुदैवाने जिवीतहानी नाही

शिंदे फडणवीस सरकार विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय गेल्यास अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.त्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले,मागील अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार हे काम करित आहे.अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अनेक पद देऊन शरद पवार यांनी न्याय देण्याच काम केले आहे.त्यामुळे अजित पवार हे भाजप सोबत जाणार नाही.तसेच मध्यंतरी अजित पवार हे आजारी होते.त्यामुळे त्यांचा फोन बंद होता.त्यावेळी देखील अशाच चर्चा सुरू होत्या.अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.