Kiwle : गुंतवणुकीवर जास्त नफा मिळण्याच्या आमिषाने 57 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तिकिटिंग मध्ये पैसे गुंतविण्यास (Kiwle) भाग पाडून एका व्यक्तीची 57 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत किवळे येथे घडला.

शामकुमार दुधराम तुमसरे (वय 40, रा. किवळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : ….तर आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री करू – रामदास आठवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी महिलेच्या टेलिग्राम आयडीवरून फिर्यादी यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यावर खाते उघडण्यास भाग पाडून तिकिटिंग करता (Kiwle) कस्टमर केअरचा टेलिग्राम आयडी पाठवण्यात आला. त्याद्वारे फिर्यादी यांना तिकीटिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्त कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची 57 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.